तरुणाईने घडवले संस्कृतीचे ‘दर्शन’!
By Admin | Updated: February 10, 2016 22:43 IST2016-02-10T22:40:34+5:302016-02-10T22:43:25+5:30
मनमाड : लेजीम व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

तरुणाईने घडवले संस्कृतीचे ‘दर्शन’!
मनमाड : येथील महात्मा गांधी
विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘स्पंदन... एक हृदयस्पर्शी क्षण’ या
कार्यक्रमाअंतर्गत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या संस्कृती
दिनाचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी ‘तरुणाईने’ शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी यांसह महाराष्ट्रीयन विवाहसोहळा
आदि कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविले.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या
कार्यक्रमात विविध दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सारी व शेरवानी डे, मीस मॅच डे, टपोरी डे मध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, महाराष्ट्रीयन विवाहसोहळ्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
विवाह सोहळ्यात
हळद, शेवंती वरातपासून ते बिदाईपर्यंतच्या विधीचे सादरीकरण करण्यात आले होते.
तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते.
या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ पगारे, गणेश धात्रक, सतोश बळीद, जय फुलवाणी, अमीन पटेल, नाना
शिंदे, योगेश पाटील, गुरू निकाळे, नितीन अहिरराव, अरविंद काळे, उपप्राचार्य डॉ. डी. जी. जाधव,
शरद केदारे आदि मान्यवर
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले
होते. (वार्ताहर)