शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये अनोख्या सेवाभावातून घडले राम अन‌् रहीमचेही दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

निफाड तालुक्यातील पाचोरेवणी येथील सरला पुरकर या महिलेचा पती मधुकर यशवंत पुरकर हे सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत ...

निफाड तालुक्यातील पाचोरेवणी येथील सरला पुरकर या महिलेचा पती मधुकर यशवंत पुरकर हे सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत पावले. मधुकर पुरकर यांचा मुंबई-आग्रा हायवेवर पाटीत द्राक्ष घेऊन ती विकण्याचा व्यवसाय होता. ते गेल्या सहा ते सात दिवसांपासून मेट्रो, सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पत्नी सरलाबाई कोरडी भाकरी खाऊन,पाणी पिऊन सहारा हॉस्पिटलखाली उन्हा-तान्हात झोपायची. कसेबसे त्यांनी पतीवर औषधोपचार केले, परंतु पतीला वाचविण्यात तिला यश आले नाही. तिला अशक्तपणा आला. झोप नाही, राहायला जागा नाही. डोक्याला, हातापायाला मुंग्या व चक्कर येणे सुरू झाले. हाती एक रुपयाही उरला नाही. अशावेळी हॉस्पिटलमधून बंडूकाका बच्छाव यांचा नंबर मिळाला. काकांनी तिच्या पतीवर अंत्यसंस्कार करून स्वतः अग्निडाग दिला. त्या महिलेला रिक्षात बसवून आपल्या राम रहीम कोविड सेंटरमध्ये आणले. एचआरसीटी काढला. त्या महिलेचाही स्कोर दहा आला.. तिला सलग नऊ दिवस स्वतःच्या दवाखान्यात ठेवून तिच्यावर उपचार केले. २३ हजारांचे मेडिकल व सर्व उपचाराचा खर्च असा जवळपास ६० हजार रुपये स्वतः खर्च बंडूकाकांनी केला.. त्याच दरम्यान त्या महिलेची सातवीत शिकणारी मुलगी प्राची मधुकर पुरकर घरी एकटी होती. महिला सारखी तिचा विचार करीत असायची. गावातील लोक तिला वाळीत टाकतील अशी तिला भीती वाटायची.लगेचच बंडूकाकांनी आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योती ताईंनी स्वतः जाऊन त्या मुलीला मालेगावी आणून सदर महिलेच्या स्वाधीन केले..त्यामुळे महिलेचा जीवात-जीव आला व तिची प्रकृती सुधारू लागली...रोज सलग ९-दिवस घरुन डबा आणून दिला.. रोज आपुलकीने चौकशी करायचे. त्यामुळेच त्या महिलेचा जीव वाचणे शक्य झाले..

या नऊ दिवसात त्या महिलेचा एकही नातेवाईक किंवा कोणीही विचारपूस करायला आला नाही. या सर्व दिवसात बंडू काकाच त्या महिलेचे आई-बाप-भाऊ-बहीण झाले.. यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यावर सर्व स्टाफने व बंडू काकांनी त्या महिलेला साडी-चोळी घेऊन तिच्या घरी सुखरूप पोहोचविले.. याचवेळी जैन संस्कार मंचने त्या महिलेचा जैन भवन येथे हार पुष्प देऊन सत्कार केला. तिला पाच हजारांचा धनादेश सुपूर्द केला. काकांनी आपल्या वैकुंठरथाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक कोरोनाग्रस्त मृतदेह स्वतः चालकाच्या बाजूला बसून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले..आणि अलीकडेच सात-आठ दिवसात बंडूकाकांनी अनेक जणांवर स्वतःच्या हाताने अंत्यसंस्कार केले. जे रक्ताच्या नात्याला जमले नाही, ते एका परक्या परंतु संवेदनशील भावाने करुन दाखविले, याचीच कोविड सेंटर परिसरात चर्चा सुरु होती.

===Photopath===

110521\11nsk_17_11052021_13.jpg

===Caption===

मालेगाव येथे कोरोनामुक्त झालेल्या सरला पूरकर या महिलेचा सतकार करुन  तिला निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी बंडूकाका बच्छाव व वैद्यकीय कर्मचारी.