शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दरसगाव पोहोच कालवा फोडल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:42 IST

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथून जाणारा दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा जेसीबीच्या साह्याने फोडण्यात आल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

येवला : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथून जाणारा दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा जेसीबीच्या साह्याने फोडण्यात आल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.कालवा फोडणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत असताना नांदूरमध्यमेश्वर कालवा विभाग व चांदवड पोलिसांकडून कारवाई करण्यात चालढकल होत आहे. प्रशासनाच्या बेपर्वाई वृत्तीमुळे येवला तालुक्यात संताप व्यक्त होत आहेदरसवाडी कालव्यातून पाणी येवल्याकडे मार्गक्र मण करत असताना तळेगाव रोहीजवळ शनिवार (दि. २६) सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी कालवा फोडल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे, अशा आशयाचे निवेदन चांदवड तालुका पोलिसांना देण्यात आले आहे. मात्र याविषयी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस टाळाटाळ करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वरिष्ठांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी येवला तालुकावासीयांनी केली आहे .याबाबत चांदवड पोलिसांशी संपर्क केला असता पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्राची पोहोच देण्यात आली असून, गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती ठाणे अंमलदार यांनी दिली, तर याबाबत चांदवड तालुका पोलीस निरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता पाटबंधारे विभागाने माहिती दिली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. पोलीस स्थानकात पत्र दिल्याची माहिती दिल्यावर पाटबंधारे विभागानेच कारवाई करावी, पोलीस कशाला गुन्हा दाखल करतील तसेच चौकशी करून कारवाई करतो, असे मोघम उत्तर पोलिसांकडून दिले जात आहे. पोलीस प्रशासन याप्रकरणी अनास्था दाखवत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी आमदार छगन भुजबळ यांना या घटनेची माहिती देताच भुजबळ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी चर्चा करून कालवा फोडणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीFarmerशेतकरी