दारणा कोरडेठाक

By Admin | Updated: February 28, 2016 00:09 IST2016-02-27T21:53:31+5:302016-02-28T00:09:47+5:30

शेतकरी चिंताग्रस्त : महिलांची पाण्यासाठी भटकंती; तरुण रोजगारापासून वंचित

Darna Kordedak | दारणा कोरडेठाक

दारणा कोरडेठाक

लक्ष्मण सोनवणे  बेलगाव कुऱ्हे
धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुका प्रसिद्ध आहे. मराठवाड्याला पाणी पाजणारे ब्रिटिशकालीन दारणा धरण आता कोरडेठाक पडल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन सर्व धरणे भरली होती; मात्र ब्रिटिशकालीन दारणा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडल्यामुळे येथील शेतकऱ्यांपुढे पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यातच पूर्वभागात दुष्काळी स्थिती पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात दारणा धरणासह एकूण १३ छोटी-मोठी धरणे असून, दोन धरणे प्रस्तावित आहेत. ती आता कोरडीठाक पडताना दिसत आहेत. धरणाची निर्मिती झाल्यापासून गेल्या शतकापासून दारणा धरणासह कोणत्याही धरणांचा गाळ काढला नसल्याने त्यातील पाण्याचे घटते प्रमाण चिंताजनक
आहे.

Web Title: Darna Kordedak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.