विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By Admin | Updated: July 15, 2016 01:44 IST2016-07-15T01:43:34+5:302016-07-15T01:44:03+5:30

मनमाड : एनआरएमयू शाखेच्या वतीने

Dare movement for various demands | विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

 मनमाड : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन च्या वतीने रेल्वे वसाहती मधील पाणी प्रश्णासह अन्य मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या कारभारा विरोधात या वेळी घोेषणाबाजी करण्यात आली.
मनमाड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील पाण्याच्या प्रश्णाबाबाद वारंवार मागणी करूनही पाणी प्रश्ण सोडवला जात नसल्याने एनआरएमयू च्या संतप्त कार्यकर्त्यांनी संघटनेचे अध्यक्ष बी. आर. हेगडमल, सचिव ए. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. संघटनेच्या या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष देउन समस्या सोडवाव्या अन्यथा भुसावल विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येइल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला
आहे.
या वेळी संघटनेचे अंबादास निकम, रमेश केदारे, प्रविण बागूल, इम्तीयाज शेख, संदिप सोनवणे, संदिप चव्हाण, सचिन काकड, एस.पी. शहरकर, हेमंत ठाकूर,प्रविण क्षिरसागर, मनोज गागरे, मोना मोहंतो, भारती कुशावह, आशा इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Dare movement for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.