अस्वच्छतेमुळे त्र्यंबकेश्वरला डेंग्यूचे तीन रुग्ण
By Admin | Updated: July 2, 2017 23:42 IST2017-07-02T23:42:22+5:302017-07-02T23:42:22+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात डेंग्यूचे तीन रु ग्ण आढळले आहे.

अस्वच्छतेमुळे त्र्यंबकेश्वरला डेंग्यूचे तीन रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात डेंग्यूचे तीन रु ग्ण आढळले असून, हे तीनही रु ग्ण येथील ऐन त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील वर्दळीच्या ठिकाणी राहतात. माजी नगराध्यक्षांच्या दोन मुलांना डेंग्यू झाल्याने गावात हा चर्चेचा विषय झाला आहे. या डेंग्यूग्रस्तांवर त्र्यंबक येथील डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी त्यांच्या घरी जाऊन उपचार केल्यानंतर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता त्यांना बरे वाटत असले तरी प्रश्न उरतो तो पालिकेच्या स्वच्छतेचा डांगोरा पिटण्याचा...! नुकतेच पालिकेला अडीच कोटींचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने बहाल केले आहे. त्या अगोदर सिंहस्थ संपल्यानंतर एक कोटीचे बक्षीस मिळाले होते. सिंहस्थाचे ठीक आहे. सिंहस्थातील सफाई कामगारांच्या खऱ्या मेहनतीचे ते फळ होते. त्या काळात साधू- महंतांनीदेखील स्वच्छतेची वाखाणणी केली होती. फक्त ओला कचरा व प्लॅस्टिक कचरा लोकांकडून विभागून मागितला जात आहे. त्यासाठी घंटागाडीवर ध्वनिक्षेपक लावून त्यावर ध्वनिफीत वाजवली जात आहे. बाकी काहीच उपाययोजना नाही. कायम कर्मचारी बोटावर मोजण्याइतपत आहेत. बाकी सर्व रोजंदारीवर कर्मचारी लावून काम करून घेतले जाते. त्यामुळे गावात आज तीन जणांना डेंग्यूची लागण झाली होती.
उद्या आखणी लागण झाली तर... म्हणूनच पालिकेने याबाबतीत उपाय योजना करणे गरजेचे आहे.
कोट:- अडीच कोटमध्ये देखील पालिकेने विविध उपक्र म राबविणे, केलेली विकास कामे व भविष्यात करणार असलेली कामे आदींचे भरविलेले प्रदर्शन भारत स्वच्छता अभियान आदी कार्यक्र माची नगरपालिका विकास दिन कार्यक्र मात थेट नगरविकास सप्ताह म्हणून साजरा केला. त्याचे बक्षीस म्हणून अडीच कोटी रु पये पालिकेला मिळाले. पण पाण्यापासून होणार्या रोग प्रतिबंधक कारवाईच्या उपाययोजना मात्र पालिकेने काहीच केल्या नाहीत. आण ित्यामुळेच डेंग्युसारखी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे.