डेंग्यूचा संशय : चेतनानगर-राणेनगर परिसरातील दुसरा बळी

By Admin | Updated: November 14, 2014 01:01 IST2014-11-14T00:50:06+5:302014-11-14T01:01:34+5:30

नाशकात मनसे नगरसेवकाच्या पतीचा मृत्यू

Dangue suspect: Second victim in Chetan Nagar-Ranenagar area | डेंग्यूचा संशय : चेतनानगर-राणेनगर परिसरातील दुसरा बळी

डेंग्यूचा संशय : चेतनानगर-राणेनगर परिसरातील दुसरा बळी

नाशिक : इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक ५३ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक अर्चना जाधव यांचे पती संजय सुपडू जाधव यांचा डेंग्यूसदृश आजाराने गुरुवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना, त्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या घरात डेंग्यूसदृश आजाराने दु:खद घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या मंगळवारी (दि. ११) संजय सुपडू जाधव (४५) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जाधव यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार केले जात असतानाच गुरुवारी सायंकाळी जाधव यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पंचवटी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहचत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली, असे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. जाधव यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या घटली होती, असे प्रथमदर्शनी समजते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, भावजई, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या राहत्या निवासस्थानी महापौर अशोक मुर्तडक, माजी आमदार वसंत गिते, मनसेचे गटनेते अशोक सातभाई, नगरसेवक सतीश सोनवणे, यशवंत निकुळे, देवानंद बिरारी आदिंनी भेट देऊन जाधव परिवाराचे सांत्वन केले. जाधव यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी (दि. १४) सकाळी अकरा वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Dangue suspect: Second victim in Chetan Nagar-Ranenagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.