डांगसौंदाणे- सटाणा रस्त्याची दुरुस्ती

By Admin | Updated: July 25, 2016 23:26 IST2016-07-25T22:27:35+5:302016-07-25T23:26:41+5:30

दखल : खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून केली डागडुजी

Dangsawondo-Sattna road repair | डांगसौंदाणे- सटाणा रस्त्याची दुरुस्ती

डांगसौंदाणे- सटाणा रस्त्याची दुरुस्ती

डांगसौंदाणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करु न परिसरातील रस्त्याची परिस्थिती मांडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरु केले आहे.
डांगसौंदाणे-सटाणा हा एक वर्षापूर्वी तयार केलेला मुख्य रहदारीचा रस्ता असून डांगसौंदाणे गावाजवळ मोठ्या पावसाने हा रस्ता खचून वाहून गेल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. याच रस्त्यावर लाखों रूपये खर्च करून नव्याने दुपदरी रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजुस पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चारीच तयार केलेली नसल्याने आजुबाजुची माती लहान दगड रस्त्यावर वाहून आल्यामुळे दलदल निर्माण होवून वाहने घसरून अपघात होत असल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. पावसाने खचून गेलेल्या रस्तावर मुरूम टाकून भर करु न वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. तसेच पावसाने रस्तावर माती व दगड वाहून दलदल निर्माण होणाऱ्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस चाऱ्या खोदून साईड पट्ट्यांना भर देण्यात आली आहे. तर पावसाच्या पाण्याने रस्तावर पडलेले खळगेही माती टाकून बुजविण्यात आले आहेत.(वार्ताहर)

Web Title: Dangsawondo-Sattna road repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.