वडाळा रस्त्यावरील लोंबकळणार्या वीजतारांचा धोका
By Admin | Updated: May 10, 2014 23:51 IST2014-05-10T22:08:04+5:302014-05-10T23:51:31+5:30
वडाळागाव : वडाळा रस्त्यालगत असलेले महावितरणचे जमिनीच्या दिशेने झुकलेले विद्युत खांब व लोंबकळणार्या धोकेदायक वीजतारांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महावितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन धोकेदायक विद्युत खांब व वीजतारा सुरक्षित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

वडाळा रस्त्यावरील लोंबकळणार्या वीजतारांचा धोका
वडाळागाव : वडाळा रस्त्यालगत असलेले महावितरणचे जमिनीच्या दिशेने झुकलेले विद्युत खांब व लोंबकळणार्या धोकेदायक वीजतारांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महावितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन धोकेदायक विद्युत खांब व वीजतारा सुरक्षित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
वडाळा रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने रस्त्याचे रुपडे पालटले असून, रस्त्यावरील वाहतूकदेखील वाढली आहे. या रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या काही विद्युत खांबांची दुरवस्था झाली असून, ते जमिनीच्या दिशेने झुकलेले आहे. काही वीजतारा तुटून लोंबकळत आहे, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या काही खांबांना आधार देण्यासाठी लावण्यात आलेल्या ॲल्युमिनिअमच्या तारा या रस्त्यात येत असून, रात्रीच्या वेळी सदर तारा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यालगत असलेले विद्युत खांब कमी उंचीचे असल्यामुळे वीजतारा अधिकच खाली आल्या आहेत. तसेच म्हसोबा महाराज मंदिर ते वडाळा चौफुली दरम्यानच्या काही वीजतारा तुटून लोंबकळत आहे. सायकलवरून गेल्यासदेखील सहजपणे या तारा डोक्याला लागतील एवढ्या खाली आल्या आहेत. रात्रीच्या सुमारास तर या धोकेदायक तारा लक्षातच येत नसल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.