शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:24 IST

जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पूर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कोसळला.

नाशिक : जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पूर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कोसळला. इमारतीच्या दर्शनी भागाच्या दगडी भिंतीला तडे गेल्याने हा भाग धोकादायक झाला होता. दुपारी उंचावरून काही दगड खाली कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही धाव घेऊन पाहणी केली.मेनरोडवर महापालिकेची जुनी इमारत ब्रिटिशकालीन असून, ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तुला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरुवातीला हे मुख्यालय होते. त्यानंतर पूर्व विभागाचे कार्यालय अशी नवी ओळख या दगडी इमारतीला मिळाली. इमारतीच्या  देखभाल, दुरुस्तीबाबत प्रशासनाने कधीही लक्ष पुरविणे गरजेचे समजले नाही. दगडी इमारतीत पक्ष्यांच्या विष्ठेतून रोपे उगवून त्यांची वाढदेखील झाली, मात्र सदर रोपे काढण्याबाबतही महापालिकेने कधी पुढाकार घेतला नाही. वर्षानुवर्षांपासून या इमारतीची दुरवस्था वाढीस लागत आहे. काही ठिकाणची चुनखडीदेखील निघून गेली आहे. यामुळे भिंतीला मोठा तडा गेलेला असताना तो भाग आज दुपारच्या सुमारास कोसळला. या इमारतीला लागून बहुसंख्य विक्रेते आपला व्यवसाय करतात. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. दुपारच्या सुमारास इमारतीचे वरील बाजूने काही दगड कोसळले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. विक्रेत्यांनी तत्काळ आपला ‘बिºहाड’ आवरता घेतला.मेनरोड ही शहराची अत्यंत जुनी व महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. गावठाण भाग असल्यामुळे या भागात येणारे रस्ते अरुंद व दाटीचे आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यास त्यामुळे मोठा अडथळा निर्माण होतो. महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय चालविल्या जाणाºया या दगडी इमारतीची अवस्था बिकट असून, दगडी भाग निखळून कोसळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे...तर स्थलांतर होणारमहापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालय ज्या इमारतीत भरते त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही इमारत धोकादायक ठरली तर त्यातील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेची ही इमारत अत्यंत जुनी असून, त्यामुळे इमारतीला अनेक तडे गेले आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक आहे. द्वारका येथे नवीन कार्यालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला गती मिळालेली नाही.

टॅग्स :RainपाऊसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका