अधिकाºयांच्या धास्तीने बनविला दर्जेदार आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:12 IST2017-09-10T00:11:54+5:302017-09-10T00:12:19+5:30
देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडीचा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हाभर गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे व महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी शनिवारी येवल्याला अचानक भेट देत ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.

अधिकाºयांच्या धास्तीने बनविला दर्जेदार आहार
येवला : देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडीचा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हाभर गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे व महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी शनिवारी येवल्याला अचानक भेट देत ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.
३० आॅगस्ट रोजी दुपारी अंगणवाडी सेविका आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवित असताना अचानक अंगणवाडीचा दरवाजा पडून वेदांत भालके व प्रणेती बागुल हे विद्यार्थी जखमी झाल्याने ग्रामस्थांनी देशमाने ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची दखल घेऊन दत्तात्रय मुंढे यांनी अंगणवाडीला भेट दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडी क्र मांक २ चा दरवाजा पडून दोन
विद्यार्थी जखमी प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाची कानउघाडणी करत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरत, बेजबाबदारपणाबद्दल खडसावले. देशमाने परिसराची पाहणी करून ग्रामपंचायतीच्या विविध निकष व नियमावलीच्या अधीन राहून ग्रामपंचायतीने काम करावे तसेच सरपंचांनी ग्रामपंचायतीची सर्व कार्यपद्धती समजून घेऊन व्यवस्थित अभ्यास करावा अन्यथा चुका झाल्यास कायदा सर्वांनाच लागू पडतो असेही मुंढे यांनी सांगितले. त्यानंतर आहार चौकशी, मुलांची पटसंख्या, विद्यार्थी प्रगती आदी बाबींची चौकशी करण्यात येऊन अंगणवाडी सेविकेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.