शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

धोका टळला : नामको रूग्णालयात बिबट्याची मध्यरात्री ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:05 IST

मागील दीड महिन्यांपासून नागरिकांची वर्दळ शहरातील विविध रस्त्यांवरून अचानकपणे कमी झाल्यामुळे वन्यजीवांचा मुक्तपणे वावर वाढला आहे.

ठळक मुद्देबिबट संचार सीसीटीव्ही फुटेजमधून सहज दिसून येतोदाट लोकवस्तीमुळे धोका अधिकमेरी-म्हसरूळसह पंचवटीत अनेकदा दर्शन

नाशिक : शहराच्या अगदीजवळ असलेल्या पेठरोडवरील नामको रुग्णालयाच्या आवारात बिबट्याने संचार करत थेट स्वागतकक्षापर्यंत गुरूवारी (दि.६) मध्यरात्री ‘एन्ट्री’ मारली. सुदैवाने यावेळी येथील काचेचा दरवाजा बंद असल्यामुळे बिबट्या माघारी फिरला अन् पायऱ्या उतरून पुन्हा बाहेर पळून गेल्याने अनर्थ टळला.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात सर्वत्र लॉकडाउनची स्थिती असल्यामुळे संध्याकाळी सर्वत्र लवकरच सामसूम पसरत आहे. मागील दीड महिन्यांपासून नागरिकांची वर्दळ शहरातील विविध रस्त्यांवरून अचानकपणे कमी झाल्यामुळे वन्यजीवांचा मुक्तपणे वावर वाढला आहे. दारणा नदीकाठालगतच्या गावांमध्येही बिबट्याचा संचारासोबत हल्लेदेखील वाढले आहे. हिंगणवेढे, दोनवाडे या गावांमध्ये दोघा मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यूदेखील मागील पंधरवड्यात झाला.

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या नामको रुग्णालयाच्या इमारतीच्या आवारात रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने एन्ट्री केली. बिबट्याचा संचार येथील सीसीटीव्ही कॅमेºयात पुर्णपणे कैद झाला. बिबट्या मुख्य दरवाजातून आत येतो आणि स्वागतकक्षाजवळच्या काचेच्या दरवाजापुढे येऊन मान वळवितो दरवाजा बंद असल्याचे लक्षात येताच काचेत आपलेच प्रतिबिंब दिसल्याने अगदी काही सेकंदात बिबट्या पळत पुन्हा रूग्णालयाच्या पाय-या उतरून बाहेर धूम ठोकतो, त्याच्या संचाराचा हा क्रम सीसीटीव्ही फुटेजमधून सहज दिसून येतो.पहिल्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाच्या ही बाब लक्षात येताच ते तत्काळ अन्य सुरक्षारक्षकांना याबाबत सतर्क करतात. सुरक्षारक्षक दारे-खिडक्या झटपट बंद करून घेत पंचवटी पोलीसांसह अग्निशमन दल व वनविभागाला घटनेची माहिती कळवितात. काही सेकंदात वनविभागाची गस्तीपथकाचे वाहनचालक प्रवीण राठोड यांना घेऊन अंजनेरी परिमंडळाचे रात्रपाळीवर असलेले वनपाल सुजीत बोकडे, वनरक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे तत्काळ रुग्णालयात पोहचतात. तोपर्यंत पोलिसांचे गस्तीपथकासह अग्निशमन दलाचे जवानही दाखल होतात; मात्र बिबट्याने रुग्णालयाच्या परिसरातून पुन्हा मखमलाबादच्या डाव्या तट कालव्याच्या दिशेने पलायन केलेले होते.वनविभागाच्या गस्तीपथकाने बिबट्याचा येथील मळे भागात शोध घेतला मात्र यावेळी कोठेही बिबट्याने कोणालाही दर्शन दिल्याची माहिती मिळू शकलेली नाही. सुदैवाने रुग्णालयाचा काचेचा दरवाजा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा बिबट्याने रुग्णालयात धुमाकूळ घातला असता. नामको रुग्णालयाच्या आवारात कॅन्सर विभाग, रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास-भोजनाकरिताचे सेवा सदन आणि परिचारिका महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते.दाट लोकवस्तीमुळे धोका अधिकनामको रुग्णालय परिसरात कर्णनगर, अश्वमेघनगर, सप्तरंग सोसायटी आदींसह विविध उपनगरी कॉलन्यांचा परिसर असून दाट लोकवस्ती आहे. तसेच जवळच शरदचंद्र पवार बाजारसमितीही आहे. बाजारसमितीत दररोज शेकडो नागरिकांचा वावर असतो वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात त्याच्या वावर असल्याच्या खाणाखूना शोधून योग्य त्या ठिकाणी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दाट लोकवस्तीजवळ हे रुग्णालय असून तेथे बिबट्या येणे ही बाब नक्कीच धोकादायक असून वनविभागाला याची पुर्णपणे जाणीव आहे; मात्र नागरिकांनी घाबरून न जाता कुठल्याहीप्रकारे अफवा पसरवू नये, लॉकडाउनच्या काळात कुठलीही अन्य अपात्कालीन स्थितीला निमंत्रण देऊ नये. वनविभागाच्या पथकाला सहकार्य करावे, लवकरच पिंजरा लावून बिबट्या जेरबंद केले जाईल, त्यादृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू झाले आहे.- विवेक भदाणे, वनक्षेत्रपाल, नाशिक पश्चिम 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव