शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मुंबई नाका ते आडगाव नाक्यापर्यंत धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 10:16 PM

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ...

ठळक मुद्देमहामार्गावर प्रवेश ‘बंद’दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ।

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे आणि उड्डाणपुलाच्या गळक्या पाइपलाइन-मधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्ता निसरडा बनल्याने वाहने घसरून अपघातांना निमंत्रण मिळू लागल्याने रस्ता बंद केला गेला; मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली जात नसल्याने वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबई नाका, द्वारका, वडाळा नाका, टाकळी फाटा, जुना आडगाव नाका आदी चौफुल्यांवर बॅरिकेड्स लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. द्वारकेवरून आडगावकडे ‘नो एण्ट्री’एकीकडे महामार्ग निसरडा व धोकादायक झाला असताना द्वारका चौकातून आडगावकडे जाण्यासाठी उड्डाणपुलावरदेखील अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे अवजड व शहरातील हलकी वाहने समांतर रस्त्यावरून मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत.महामार्ग तत्काळ सुरक्षित कराशहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. सोमवारी (दि.३१) पावसाने उघडीप दिली होती तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरक्षित करून तो खुला करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. गेल्या सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आला असून, अग्निशमन दलाच्या मदतीनेतसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणचा चिखल काढून रस्ता सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र हे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग