माकपासाठी धोक्याची घंटा

By Admin | Updated: February 25, 2017 00:09 IST2017-02-25T00:09:08+5:302017-02-25T00:09:26+5:30

माकपासाठी धोक्याची घंटा

Danger hour for CPI (M) | माकपासाठी धोक्याची घंटा

माकपासाठी धोक्याची घंटा

श्याम खैरनार : सुरगाणा
जिल्हा परिषदगट व पंचायत समिती गणात माकपाने वर्चस्व राखले असले तरीही हट्टी गट व गणात कमळ फुलल्याने तसेच भवाडा गटात शिवसेना उमेदवारांकडून कडवे आव्हान देण्यात आल्याने गोंदूणे गट वगळता भविष्यात भवाडा व हट्टी गटात माकपासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.  भवाडा व गोंदूणे गटात माकपा,राष्ट्रवादी कॉग्रेसकडून बाहेरचे उमेदवार देण्यात आले. गोंदूणे गट व गणात माकपा कडून कोणीही उमेदवार असो तो निवडून येतोच ही सत्यता आहे. मात्र या निवडणूकीत गोंदूणे गट वगळता भवाडा व हट्टी गटात माकपपुढे आव्हान निर्माण झाले होते. गटातील भाजप उमेदवार व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती यांना घाटमाथ्यावरिल मते कमी मिळाल्याने त्यांचा ३८७ मतांनी झालेला विजय निसटता आहे. भविष्यात भाजपसाठी या गटात सोनं करण्याची संधी आहे. हट्टी गणात भाजपचेच एन.डी.गावित निवडून आले. गेल्या निवडणूकीत ते गोंदूणे गटातून पराभूत झाले होते. मागचा अनुभव लक्षात घेत यावेळी माकपाप्रमाणेच नियोजनबद्ध रणनिती अवलंबल्यानेच त्यांचा विजय झाला आहे. एन.डी. गावित यांचेही त्यातयोगदानआहे. हा विजय भाजपसाठी महत्वपूर्ण समजला जात आहे. माकप उमेदवार व माजी उपसभापती सावळीराम पवार यांचा १६२४ मतांनी पराभव झाला आहे. शिवसेनेने हाती असलेला एकमेव बोरगाव गण देखील गमावला आहे. चौरंगी लढतीत मत विभागणीमुळेसेनेचा पराभव झाला. मतविभागणी होणार नाही याची काळजी घेतली असती तर येथे पुन्हा शिवसेनेने बाजी मारली असल्याचेबोललेजातआहे. बोरगाव गणातील चौरंगी लढतीत माकप उमेदवार सुवर्णा गांगोडे विजयी झाल्या. हा एकमेव गण शिवसेनेकडे होता.  पहिलीच निवडणूक लढवत असलेल्या सोनालीराजे यांनी कार्यकर्त्यांच्या साथीने चांगलीच लढत दिली. मात्र पवार यांचा पराभव झाला. भवाडा गटात माकप विरोधात स्थानिक भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस युती झाली असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे बाहेरील उमेदवार दिला. या उमेदवाराला केवळ ४०१ मते मिळाली. याठिकाणी सहा उमेदवार होते. माकप व शिवसेना उमेदवार वगळता उर्वरीत उमेदवारांना नगण्य मते मिळाली. सहा पैकी दोन अपक्ष उमेदवार माकप पुरस्कृत होते. दोन्ही अपक्षांना मिळून ४३५ मते मिळाली. भवाडा गटात नोटाला तब्बल १०८१मते पडली. त्यातहीभवाडा गटात निर्माण केलेले अस्तीत्व सेनेसाठी लाखमोलाचे समजले जाते.  शिवसेनेकडील बोरगाव गण माकपने हिरावला आहे. तर हट्टी गट व गणात कमळ फुलले आहे. गोंदूणे व भवाडा गटात माकपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. गणात विजय घांगळे यांना माकपने निवडून आणले. येथे भाजपचे उमेदवार सुरेश चौधरी यांना दोन नंबरची मते मिळाली. पळसन गणात एकास एक लढत होऊनही येथे शिवसेना उमेदवार अंजना वार्डे यांचा पराभव झाला.  भवाडा गणात माकप उमेदवार मनिषा महाले कडून अपक्ष उमेदवार भारती धूम यांचा केवळ ५८१ मतांनी पराभव झाला. येथील लढतही चांगली झाली. त्यामुळे भविष्यात पुढील निवडणूकीत माकपला लक्ष घालावे लागणार आहे. भदर गणात एकास एक लढत झाली. आमदार जे.पी.गावित यांचे पुत्र इंद्रजित सर्वाधिक मतांनी निवडून आले. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाळू गावित यांचा पराभव झाला. यापुढे गणात राष्ट्रवादीला चांगली तयारी करावी लागणार आहे.

Web Title: Danger hour for CPI (M)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.