दांडियाला आला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:35 IST2017-09-28T00:35:12+5:302017-09-28T00:35:18+5:30
नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र बहरला असून, दांडियाला उधाण आले आहे. गीत संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आबालवृद्धांसह कुटुंबाच्या सहभागाने नवरात्रोत्सवात जल्लोष संचारला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या गरबा-रास दांडियात पारंपरिक गरबा नृत्याने रंगत भरली आहे तर आकर्षक वेशभूषा उत्सवाची रंगत वाढवत आहे.

दांडियाला आला बहर
नाशिक : नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र बहरला असून, दांडियाला उधाण आले आहे. गीत संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आबालवृद्धांसह कुटुंबाच्या सहभागाने नवरात्रोत्सवात जल्लोष संचारला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या गरबा-रास दांडियात पारंपरिक गरबा नृत्याने रंगत भरली आहे तर आकर्षक वेशभूषा उत्सवाची रंगत वाढवत आहे. उपनगरांमध्ये नवरात्रोत्सवातील दांडिया रासमध्ये तरुणाई आॅर्केस्ट्राच्या तालावर थिरकत आहे. आबालवृद्धांनी दांडिया रासला उदंड प्रतिसाद दिला आहे. दररोज बक्षिसांची लयलूट करण्यात येत आहे. पांडवनगरी येथील नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दांडिया रासलाही उदंड प्रतिसाद मिळत आहे.