शहरात दांडियाची धूम
By Admin | Updated: October 19, 2015 22:08 IST2015-10-19T22:07:50+5:302015-10-19T22:08:45+5:30
शहरात दांडियाची धूम

शहरात दांडियाची धूम
शहरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष रंगत असून, सर्वत्र दांडिया-गरबा उत्साहाने खेळला जात आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांनी परंपरागत गरबा नृत्याचे आयोजन करून तरुणांना आकर्षित केले आहे. वेळेची मर्यादा असल्याने उत्सवाला रंग चढण्यापूर्वीच दांडिया बंद करावा लागत असल्याने आयोजकांसह दांडियाप्रेमींनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांच्या नवरात्रोत्सवाबरोबरच गुजराथी बांधवांचा गरबा-दांडिया पाहण्यासाठी गर्दी होत आहे. नाशिकरोड, सिडको, पंचवटी आणि गंगापूररोड परिसरात असलेल्या गुजराथी बांधवांनी रंगारंग अशा गरबा सोहळ्याचे आयोजन केले आहे.