कळवणला दांडियाची धूम
By Admin | Updated: September 28, 2014 22:44 IST2014-09-28T22:42:15+5:302014-09-28T22:44:07+5:30
तरुणाईचा उत्साह : रावण दहनाची जय्यत तयारी

कळवणला दांडियाची धूम
कळवण : नवरात्र उत्सव, तारुण्याचा सळसळता उत्साह, लाल, पिवळ्या, हिरव्या, केशरी अशा विविध रंगाच्या कपड्यांनी झालेले कलरफूल वातावरण आणि बेफाम, बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई असे दृश्य कळवणसारख्या आदिवासी भागातील शहरात बघावयास मिळत आहे.
नवरात्र उत्सवात दांडियाचा उत्सव द्विगुणीत व्हावा, कळवणकर जनतेला त्यात सहभागी करून घेता यावे या हेतूने छत्रपती शिवाजीनगर कला-क्र ीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ व आदर्श सोशल ग्रुपने गेल्या वर्षापासून कळवण शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मैदानावर दांडिया रासचे आयोजने केले असून, शहरातील व परिसरातील शेकडो तरुण यात सहभागी होत आहेत.
कळवण शहरात नवदुर्गा फ्रेंडस सर्कल, विठ्ठल मंदिर लेन, दुर्गामाता नवरात्र मित्रमंडळ, सप्तशृंगी देवी नवरात्र मित्रमंडळ, शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ, दुर्गा मित्रमंडळ, माता फुलाबाई चौक नवरात्र उत्सव मंडळ, माता मित्रमंडळ आदि मंडळांच्या माध्यमातून नवरात्र उत्साहात साजरा केला जात आहे, नवरात्र उत्सवातील भारनियमन यंदाच्या वर्षी न झाल्याने उत्साह द्विगुणीत झाला आहे. गांधी चौकातील कुलस्वामिनी अंबिका देवी मंदिर, गणेशनगरमधील श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सव धार्मिक व मंगलमय वातावरणात विविध कार्यक्र मांचे आयोजन करून साजरा केला जात आहे कळवण शहरातील युवक, युवती यांच्याबरोबर बाल-गोपाळदेखील गरबा, टिपरी नृत्य करण्यास आदर्शच्या दांडिया रासमध्ये हजेरी लावत आहे. दांडियासाठी आकर्षक रोषणाई केल्याने रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघत आहे. (वार्ताहर)