कसबे सुकेणे ते शिर्डी पायी दिंडी सोहळा
By Admin | Updated: October 30, 2014 22:35 IST2014-10-30T22:35:37+5:302014-10-30T22:35:52+5:30
कसबे सुकेणे ते शिर्डी पायी दिंडी सोहळा

कसबे सुकेणे ते शिर्डी पायी दिंडी सोहळा
कसबे सुकेणे : कसबे सुकेणे ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील साई मंदिरापासून शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता होईल. साईपालखीचे पूजन होऊन टाळ-मृदंगाच्या गजरात हा दिंडी सोहळा निघणार आहे. या दिंडी सोहळ्याचा मुक्काम खेडलेझुंगे येथील नक्षत्रवनात असेल. दिंडी सोहळ्याच्या वाटचालीत भजन, साई आरती आदि कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन साईभक्तांनी केले आहे. (वार्ताहर)