नौकानयनपटू दत्तू भोकनळने दिली बारावीची परीक्षा
By Admin | Updated: March 1, 2017 00:11 IST2017-03-01T00:11:41+5:302017-03-01T00:11:57+5:30
रिओ आॅलिम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ याने लासलगाव/चांदवड : लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात इंग्रजी विषयाची परीक्षा दिली.

नौकानयनपटू दत्तू भोकनळने दिली बारावीची परीक्षा
लासलगाव/चांदवड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून राज्यात शांततेत सुरू झाली. रिओ आॅलिम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ याने लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. या दरम्यान नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह तीन सदस्यांच्या भरारी पथकाने तपासणी केली. यावेळी दत्तू भोकनळ हा इंग्रजीचा पेपर देत असलेल्या ब्लॉकला त्यांनी भेट दिली. दत्तू भोकनळ याने चांदवड तालुक्यातील संत ज्ञानेश्वर विद्यालय, तळेगाव येथे आपले दहावीपर्यंतचे शिक्षण सन २०११ साली पूर्ण केले. यानंतर दत्तू हा सन २०१२ मध्ये सैन्यदलात भरती झाला. सन २०१२ ते १६ दरम्यान त्याने रिओ आॅलिम्पिक मध्ये नौकानयनपटू नावलौकिक मिळविला. सन २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी तो ७० टक्के खेळासाठी तर ३० टक्के अभ्यासासाठी वेळ देत आहे. (वार्ताहर)