डीजेवर नाचण्यावरून मारहाण
By Admin | Updated: June 9, 2014 00:07 IST2014-06-08T00:48:04+5:302014-06-09T00:07:09+5:30
डीजेवर नाचण्यावरून मारहाण

डीजेवर नाचण्यावरून मारहाण
पंचवटी : हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डीजे साऊंड सिस्टीमवर नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन मारहाणीत होऊन दोघांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे.
म्हसरूळ प्रभातनगर येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत दिंडोरी तालुक्यातील आराळे येथील रहिवासी बाळू शंकर पगारे यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दिली असून, त्या तक्रारीनुसार दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पगारे यांचा भाचा श्रीकांत गांगुर्डे याचा विवाह असल्याने काल रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी डीजे साऊंड लावला होता. रात्री कार्यक्रम आटोपल्याने चालकाने डीजे बंद केला. त्याचवेळी डीजे चालकाच्या ओळखीचे तिघेजण दुचाकी (एमएच १५/इडी-८८०८) वरून आले व डीजे चालू करा असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी कार्यक्रमात जमलेले नातेवाईक फिर्यादी तसेच त्यांचा मित्र महेश पगारे हे वाद मिटविण्यासाठी गेले असता संशयितांनी त्यांच्या पोटावर, मानेवर, बरगडीवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असून, घटनेत मारहाण झालेले दोघेही गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर पोलिसांनी चार ते पाच संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. देशमुख तपास करीत आहेत. (वार्ताहर)