शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक सोहळ्यात नृत्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:35 IST

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धांना बुधवारपासून प्रारंभ झाला. प्राथमिक गटाने पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धांना बुधवारपासून प्रारंभ झाला. प्राथमिक गटाने पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सुरू झालेल्या या महोत्सवप्रसंगी नीलिमा पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सांस्कृतिक महोत्सव सुरू केला आहे. त्यासोबतच इंग्रजी बोलता येण्यासाठी तसेच प्राथमिक स्तरापासून वक्तृत्व स्पर्धा यांसारखे उपक्रम संस्था राबवत असून, येत्या काही दिवसांत शनिवार हा विनादप्तराचा वार करणार असल्याची घोषणा नीलिमा पवार यांनी यावेळी केली. सदर वार हा अ‍ॅक्टीव्हीटी डे म्हणून साजरा करणार असल्याचेही श्रीमती पवार म्हणाल्या.या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉ. सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, नानाजी महाले, अशोक पवार, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, संस्थेचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, प्रा. एस. के. शिंदे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. मुंगसे उपस्थित होते.प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सविता जाधव व श्रीमती मंगला गुळे यांनी केले. २७ रोजी माध्यमिक विभागाच्या समूहगीत व वैयक्तिक नृत्य स्पर्धा तर २८ रोजी सकाळ व दुपार सत्रात माध्यमिक विभागाच्या वैयक्तिक गीतगायन व एकपात्री नाट्य प्रयोग होणार आहेत.प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. वैयक्तिक नृत्य प्रकारात आदिवासी, भांगडा, शेतकरी, कोळी, धनगरी, गोंधळी, डोंगरी, पावरी आदी नृत्य प्रकार सादर करण्यात आले. चिमुकल्यांच्या या नृत्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. यावेळी परीक्षक म्हणून विद्या देशपांडे, संजीवनी कुलकर्णी उपस्थित होत्या. वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी प्राथमिक विभागाच्या ५० संघांनी सहभाग घेऊन नृत्य सादर केले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीcultureसांस्कृतिक