नृत्य, नाट्य, गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By Admin | Updated: February 9, 2016 22:46 IST2016-02-09T22:45:32+5:302016-02-09T22:46:03+5:30
एसकेडी स्कूल : स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे कलाविष्कार

नृत्य, नाट्य, गायनाने रसिक मंत्रमुग्ध
लोहोणेर : सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यातून भावी कलाकार निर्माण होऊ शकतात, असा आशावाद सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांनी व्यक्त केला.
भावडे, ता.देवळा येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी एसकेडी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नृत्य, नाट्य, गायन व वक्तृत्व यातून आपल्या कला-गुणांच्या जोरावर उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, एस.एन.डी. इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शशिकांत देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार देवरे, विजया फलके, समाधान देवरे, बाळकृष्ण चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी वर्षभरातील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक कार्यक्र मातील गुणी विद्यार्थ्यांना नम्रता गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी प्राचार्या नीलम घुले, उपप्राचार्य नितीन वाघ, पर्यवेक्षक एस. जे. पवार आदिंसह सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)