नाशिकच्या नृत्य दिग्दर्शकाचा चीनमध्ये झेंडा
By Admin | Updated: October 3, 2015 23:05 IST2015-10-03T23:03:27+5:302015-10-03T23:05:59+5:30
नाशिकच्या नृत्य दिग्दर्शकाचा चीनमध्ये झेंडा

नाशिकच्या नृत्य दिग्दर्शकाचा चीनमध्ये झेंडा
नाशिक : येथील नृत्य दिग्दर्शक करण-किरण यांनी चीनमध्ये कलाविष्कार सादर करीत तेथील रसिकांची दाद घेतली; शिवाय भारताचा तिरंगा फडकावत देशवासीयांची मान उंचावली.
चीनच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सिल्क रोड आंतरराष्ट्रीय कलामहोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्य कलाविष्कार कार्यक्रमात करण व किरण इंद्राणी या बहीण-भावाच्या डिव्हाइन डान्स ट्रूपने नृत्ये सादर केली. चीनच्या झियान शहरातील रेनिम स्क्वेअर येथील ग्रॅण्ट थिएटर येथे दोन, तर गॉक्सी येथील शांगलिंग लॅनेन मंदिराच्या सभागृहात एक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. ‘वन बेल्ट आॅन रोड’ या संकल्पनेवर ही नृत्ये आधारित होती.
चीन-भारत मैत्रीचे प्रतीक असलेले नृत्य, भारतीय सिनेमा, चिरंतन हिंदू धर्म आणि दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा असलेल्या विषयांना दंतकथांचे रूप देत त्यांचे नृत्याद्वारे दर्शन घडवण्यात आले. तसेच बॉलिवूड, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत यांवर आधारित नृत्येही सादर करण्यात आली. सदर कला महोत्सवात भारतासह रशिया, कार्गिस्तान, कझागिस्तान, कोरिया, इस्रायल या देशांच्या कलावंतांनीही सहभाग घेतला. (प्रतिनिधी)