नृत्य-गायनाने खुलली सायंकाळ...
By Admin | Updated: November 14, 2015 22:20 IST2015-11-14T22:11:20+5:302015-11-14T22:20:33+5:30
नृत्य-गायनाने खुलली सायंकाळ...

नृत्य-गायनाने खुलली सायंकाळ...
सिडको : द्वारका येथे अर्जुन क्रीडा मंडळ आयोजित दीपोत्सव-२०१५ या पाडव्याच्या संध्याकाळी झालेल्या मराठी व हिंदी या सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी मनमुरादपणे आनंद घेतला. द्वारका येथे नगरसेवक सचिन मराठे व डॉ. उमेश मराठे यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात नाशिकमधील १७ कलावंतांनी कलाविष्कार सादर केला. या कलावंतांचा सत्कार तबलावादक नवीन तांबट, हार्मोनियम वादक, सुभाष दसककर व बासरीवादक मोहन उपासनी यांनी केला. कार्यक्रमात आदिती पानसे, सुमुखी अथणी व कीर्ती भवाळकर यांनी व त्यांच्या शिष्यांनी नृत्य सादर केले. अरुण हरिनामे, उमेश गायकवाड, लता धुमाळ, संदीप व चेतन थाटशिंगार, अतुल व राहुल गांगुर्डे, मीना निकम, गीता माळी, संज्योती देवरे, जितेंद्र देवरे, मृण्मयी दडके, आरती कुलकर्णी आदिंनी सादरीकरण केले.
अमोल पाळेकर यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन श्रीपाद कोतवाल, तर वादक कलाकार अनिल धुमाळ, स्वराज्य धुमाळ, रागेश्री धुमाळ आनंद ओक हे होते. ध्वनी संयोजन तुषार बागुल यांचे होते. (प्रतिनिधी)