पांगरी परिसरातील धरणांना पावसाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:16+5:302021-09-26T04:15:16+5:30
पांगरी:- सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पांगरी व परिसरात पिकांना जीवदान मिळेल एवढा पाऊस झाला असला तरी अद्यापही धरणामध्ये ...

पांगरी परिसरातील धरणांना पावसाची प्रतीक्षाच
पांगरी:- सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पांगरी व परिसरात पिकांना जीवदान मिळेल एवढा पाऊस झाला असला तरी अद्यापही धरणामध्ये फक्त जेमतेम पाणी जमलेले दिसते. नदी, नाळे, बंधारे भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवशकता असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सर्वदूर पाऊस होऊन नदी, नाले दुथडी भरून वाहत असून, सर्व बंधारे जवळ जवळ भरले आहेत. परंतु अद्याप पांगरी व परिसरातील नदी, नाले, बंधारे भरलेले नाहीत. दुसरीकडे पूरस्थिती असताना पूर्व भागात पाऊस पडतो. परंतु नदीला पूर येईल एवढा पाऊस अद्यापही पडलेला नसल्याने येथील जाम नदीवर असणारा वसंत बंधारा यावर्षी पावसाच्या पाण्याने भरलेला नाही. दोन वर्षांपासून बंधारा भरत असल्याने पाणीटंचाई कमी झाली होती. आता भोजापूर धरणही पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने त्याचे पूरपाणी पूर्व भागाकडे येण्याचा प्रश्न मिटल्याने रब्बीच्या आशा धूसर झाल्या आहेत. पांगरीचा वसंत बंधारा भरल्यास पिण्याची पाणीटंचाई बऱ्यापैकी कमी होते; परंतु यावर्षी बंधारा भरला नसल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. पांगरी गावाचा मानेगावसह सोळा गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे; परंतु सिन्नर-शिर्डी रस्त्याचे काम सुरू असल्याने देवपूर फाटा ते पांगरीपर्यंत असलेली योजनेची पाइपलाइन पूर्णत उद्ध्वस्त झाली आहे. नवीन पाइपलाइनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु कासवगतीने काम सुरू असल्याने उन्हाळा सुरू होण्याआधीच काम होणे गरजेचे आहे.
---------------------
रब्बी पिकांना धोका
आतापर्यंत झालेल्या पावसावर खरीप हंगाम येणार असला तरी मोठा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. विहिरींना पाणी उतरणार नसल्याने जनावरांचा पाणीप्रश्न तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. परतीच्या पावसाने तरी नदी, नाले, बंधारे भरून जावे या अपेक्षाने मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. (२५ पांगरी डॅम)
250921\25nsk_8_25092021_13.jpg
२५ पांगरी डॅम