डोंगरगावच्या धरणात निम्मा गाळच

By Admin | Updated: June 28, 2014 01:13 IST2014-06-27T21:50:38+5:302014-06-28T01:13:39+5:30

डोंगरगावच्या धरणात निम्मा गाळच

Damangala dam in Dongargaon dam | डोंगरगावच्या धरणात निम्मा गाळच

डोंगरगावच्या धरणात निम्मा गाळच

४१९७१ मध्ये पडलेला दुष्काळ डोंगरगाव परिसराच्या दृष्टीने इष्टापत्ती ठरला. त्यातूनच १९७१ मध्ये १.६४ दशलक्षघनफूट जलसाठवण क्षमतेचा मातीकाम प्रकारातील तलाव पूर्ण झाला. त्याची लांबी ७८० मीटर, तर उंची ११.६६ मीटर आहे. येवला भारम रस्त्यालगत दोन डोंगरादरम्यान दक्षिणवाहिनी देव नदीवर बांधलेले हे धरण सुमारे ६६ हेक्टर बुडित क्षेत्रात आहे. लागवडीलायक क्षेत्र ५१० हेक्टर असून, सिंचनालायक क्षेत्र ३९० हेक्टर आहे. डोंगरगाव, पिंपळखुटे खु।। पिंपळखुटे बु।। देवठाण, तळवाडे ही गावे या धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. सध्या या धरणात पाण्याऐवजी ५० टक्के गाळच भरलेला आहे.
ब्रिटिशकालीन तलावाचे धिंडवडे
४खिर्डीसाठे येथील येथे १९०४ मध्ये या तलावाचे बांधकाम झाले. हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. यातील उपयुक्त जलसाठा २ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची लांबी ७६५ मीटर आहे, तर उंची १२.११ मीटर आहे. बुडित क्षेत्र ११४ तर सिंचित ३०९ हेक्टर इतके आहे. निर्मितीसाठी ११ लक्ष रुपये इतका कमी खर्च झाला आहे. आता या तलावाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत.

Web Title: Damangala dam in Dongargaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.