सनातन-सीमीवर बंदी घालण्यासाठी पुरोगामींचे धरणे
By Admin | Updated: September 23, 2015 23:42 IST2015-09-23T23:41:31+5:302015-09-23T23:42:21+5:30
सनातन-सीमीवर बंदी घालण्यासाठी पुरोगामींचे धरणे

सनातन-सीमीवर बंदी घालण्यासाठी पुरोगामींचे धरणे
नाशिक : सनातन हिंदू संघटना आणि सीमीसारख्या धर्माच्या आधारावर राष्ट्रउभारणी करणाऱ्या संस्थांवर बंदी घालावी या मागणीसाठी लोकशाही हक्क संरक्षण समितीच्या वतीने राज्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा. कलबर्गी यांच्या हत्त्यासत्राने अस्वस्थतेचे वातावरण आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्त्येसंदर्भात पोलिसांनी दोन कोटी कॉलचे दस्तावेज तपासून सनातनचे कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत.
समीर गायकवाड या आरोपीचे उघड समर्थन करणाऱ्या संघटनेने त्याच्या पाठीशी राहतानाच पोलिसांना शासन करू अशा प्रकारचे प्रक्षोभक लिखाण करून पोलिसांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असून तो निषेधार्ह असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
धरणे आंदोलनात राजू देसले, श्रीधर देशपांडे, संदीप भावसार, शांताराम चव्हाण, अॅड. मनीष बस्ते, डॉ. संजय जाधव, शशी उन्हवणे, सचिन मालेगावकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)