शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर दळवी परिसरात झेंडूचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:00 IST

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून विंचूरदळवी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात असल्याने फुलोऱ्यात आलेल्या बागांची गळकूज होत आहे. त्यामुळे औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. हीच बाब टमाटा पिकासाठीदेखील घातक ठरू शकते.टमाटा पिकाची पाने खराब होत असून, त्याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. त्यामुळे या भागातील टमाटा उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेषत: विंचूरदळवी परिसरात शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. ऐन दिवाळीच्या सणात फुलांना चांगली मागणी असते; परंतु पावसाने झेंडूची फुले सडण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसातच बळीराजा संकटात सापडला आहे.रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी खरिपाची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. केवळ ऊस व भात पिकासाठी हा पाऊस पोषक आहे. त्यातही सोंगणीस आलेल्या भाताला हा पाऊस घातक ठरत आहे. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली आदींसह परिसरातील गावांमध्ये सोयाबीनच्या सोंगणीस सुरुवात झाली आहे.सोंगणी केलेला सोयाबीन पावसात भिजत आहे. मागील आठवड्यात या मालाला मिळत असलेला भाव कालपासून थोड्या प्रमाणात घसरला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसामुळे अनेक गावांमध्ये सोंगणीस आलेल्या बाजरीची कणसे भिजली आहेत. कांद्याची रोपेही पावसामुळे खराब झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीNashikनाशिक