ओतूर परिसरात पावसाने मका, बाजरीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 10:57 PM2020-08-21T22:57:14+5:302020-08-22T01:16:06+5:30

कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात झालेल्या वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमदार नितीन पवार यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.

Damage to maize and millets due to rains in Ootur area | ओतूर परिसरात पावसाने मका, बाजरीचे नुकसान

ओतूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार नितीन पवार. समवेत कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी.

Next

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात झालेल्या वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमदार नितीन पवार यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
आठ दिवसांपासून परिसरात जोरदार वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे. उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र भामरे, जि. प. सदस्य यशवंत गवळी, संतोष देशमुख, साहेबराव देवरे, तहसीलदार बंडू कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, मंडल कृषी आधिकारी पाखरे, कृषी पर्यवेक्षक पी. एन. आहेर, सरिता राऊत, शेतकरी देवा भुजाडे, नागेश मोरे, भाऊसाहेब मोरे, दिगंबर पवार, देवेंद्र मोरे, रंगनाथ मोरे, मधुकर देवरे, मंगेश देसाई, युवराज मोरे, दीपक आहेर, धोंडू देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Damage to maize and millets due to rains in Ootur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.