झर येथे भंगार दुकानाला आगतीन लाखांचे नुकसान
By Admin | Updated: March 16, 2015 01:26 IST2015-03-16T01:26:52+5:302015-03-16T01:26:52+5:30
झर येथे भंगार दुकानाला आगतीन लाखांचे नुकसान

झर येथे भंगार दुकानाला आगतीन लाखांचे नुकसान
ओओझर : येथील कोळीवाडालगत, केजीएन कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या आझादनगरमधील भंगार मालाच्या दुकानाला रविवारी रात्री आग लागून दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे मालकालने सांगितले.
येथील भंगारच्या दुकान गुदामामध्ये विजेचे कनेक्शन नसल्याने ही आग अज्ञात इसमाकडून लावण्यात आल्याची शंका मुन्नाशेठ अत्तार यांनी व्यक्त केली. आगीत पुठ्ठा, रद्दी, रिकाम्या बाटल्या यांचे साधारणत: दोन ते तीन लाखांचे नुकसान
झाले.
एचएएल एअरफोर्स, पिंपळगाव बसवंत येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. भंगाराचे हे गुदाम हाजी मुस्ताक हाजी मुगदूल अत्तार यांच्या मालकीचे आहे. याच गुदामला लागून लाकडाची वखार आहे. पण, अग्निशामक दलाच्या तत्परतेने ही आग पसरून न देता, आटोक्यात आणल्यामुळे मोठे नुकसान टळले. (वार्ताहर)