शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

श्रमिकनगर भागात पावसामुळे कोटींच्या घरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:34 IST

महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सातपूर : महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरले. अचानक पाण्याचा प्रवाह घरात घुसल्याने घरातील रहिवाशांना बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यात लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या घरांमध्ये जवळपास पाच ते सात फूट पाणी शिरले होते. कामगार वर्ग असलेल्या या वसाहतीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. घरातील अन्नधान्य खाण्या-पिण्याचे साहित्य तर गेलेच शिवाय फ्रीज, दूरदर्शन संच, कपाट, पलंग, गाद्या, कपडे, शैक्षणिक कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, घरांचे खरेदीखत, वह्या, पुस्तके आदींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक घराचे जवळपास दोन ते अडीच लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणीश्रमिकनगर येथील माळी कॉलनीत सुमारे ३०० लोकसंख्या आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या ४५ ते ५० घरांचे रीतसर पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी केली आहे. लवकरच या ठिकाणी तसा फलक लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे संतप्त रहिवाशांनी सांगितले.४माळी कॉलनीत एवढी मोठी घटना घडली असताना स्थानिक नगरसेवकांनी कोणतीही मदत केली नाही. साधी विचारपूसदेखील केली नाही. स्थानिक नगरसेवक आले आणि लांबून पाहून निघून गेले. मात्र श्री महारु द्र हनुमान पतसंस्थेच्या वतीने डाळ, तांदूळ, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने घरातील साहित्य, अन्न, धान्य, महागड्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. वेळीच ड्रेनेज लाइन बदलली असती तर हे नुकसान झाले नसते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्यात कंपाउंडची भिंत पडली आणि पाणी घरात शिरले. दोन दिवस घरातील पाणी आणि गाळ काढायला लागले.- वीरेंद्र सोनवणेअनेक वेळा स्थानिक नगरसेवकांना भेटून ड्रेनेज लाइन बदलण्याची मागणी केली आहे. ड्रेनेज लाइन लहान आहे. महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक घराचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ? महापालिकेने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी.- आसमा शेखमहानगरपालिका प्रशासनाने माळी कॉलनीतील ड्रेनेजची लाइन ताबडतोब बदलण्याचे काम हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनाला वेळीच माहिती दिली आहे. तरीही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या प्रत्येक घराचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी.- श्रीराम मंडळ

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर