ठळक मुद्देपुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात
पेठ : दोन दिवसांपासून हवामान बदलाने पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापणी केलेले व खळ्यावर रचून ठेवलेले भाताची उडवे भिजल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या वर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी टंचाई तर नंतरच्या काळात पडणाऱ्या मुसळधार पावसाने भात शेती नष्ट झाली. कशीबशी पिके वाचवून कापणी केली. खळ्यावर मळणीसाठी तयार असलेल्या भातात आता पावसाचे पाणी शिरल्याने उरलेसुरलेही वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.