आझादनगर : मालेगाव महामार्गावरील पवारवाडी पुलाजवळ बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून उभी असलेल्या नादुरुस्त क्रुझर वाहनाच्या काचा जमावाने काचा फोडल्या. वाहनचालक अशफाक शेख सलीम (२२) रा. धुळे याने पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली.बुधवारी रात्री अशफाक शेख सलीम रा. धुळे हा सापुतारा येथून धुळे येथे जात असताना महामार्गावरील पवारवाडी पुलाजवळ क्रुझर (क्रमांक एमएच १८ १८ बीसी ९७८६) मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बंद गाडीचे इंडिकेटर चालू करीत रस्त्याच्या कडेला उभी केली. दरम्यान, गाडीत लहान मुलांचे बूट असल्याचे नागरिकांना आढळून आल्याने लहान मुलांना चोरणारे वाहन असल्याचा संशय बळावल्याने जमावाने गाडीच्या चारही बाजूच्या काचा फोडल्या. याची माहिती मिळताच पवारवाडीचे पोलीस उपनिरीषक चव्हाण, पोलीस शिपाई डामसे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावास पांगविले. पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोशल मीडियावरून केले होते.
जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:12 IST
आझादनगर : मालेगाव महामार्गावरील पवारवाडी पुलाजवळ बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून उभी असलेल्या नादुरुस्त क्रुझर वाहनाच्या काचा जमावाने काचा फोडल्या. वाहनचालक अशफाक शेख सलीम (२२) रा. धुळे याने पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली.
जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान
ठळक मुद्देघटनास्थळी धाव घेत जमावास पांगविले