धरणात मुबलक पाणी, तरही नळ जोडण्यांबाबत निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:01 IST2017-10-11T16:43:34+5:302017-10-11T17:01:07+5:30

धरणात मुबलक पाणी, तरही नळ जोडण्यांबाबत निर्बंध
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असताना शहरात मात्र इमारतीत राहणाºया मिळकतधारकांना नळजोडणी दिली जात नाही. कोणत्याही सोसायटीधारकास केवळ तळमजल्यावरच नळ जोडणी देण्याच्या एका तुघलघी निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेने सोसायटीधारकांना ते मागतील त्या मजल्यापर्यंत नळजोडणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा नळजोडणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिक शहरात यापूर्वी कोणत्याही इमारतीत पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर यापूर्वी नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र अशा नळजोडणीला पुरेसे पाणी न मिळाल्यास नागरिक तक्रार करतात, या एका कारणाने एका अधिकाºयाने सोसायट्यांना नळजोडण्या देण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोसायटीतील अनेक सभासदांना आवश्यकता असूनही जोडणी मिळत नाही. त्यामुळे वयोवृद्ध आणि अन्य नागरिकांचे हाल होत आहेत. धरणात पुरेसा साठा असल्याने आता तरी जोडण्या देण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहे.