इगतपुरी तालुक्यातील धरणे तुडूंब
By Admin | Updated: September 21, 2015 22:53 IST2015-09-21T22:52:55+5:302015-09-21T22:53:56+5:30
विक्र मी पाऊस : दारणासह कडवा, भावलीही भरले

इगतपुरी तालुक्यातील धरणे तुडूंब
घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणार्या इगतपुरी तालुक्यात गेली चार दिवसापासून मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले असून यामुळे घोटी आण िइगतपुरी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात गेली चार दिवसापासुन जोरदार पाउस पडल्याने सकाळपर्यंत 130 मिलीमीटर पाउस पडला.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.तालुक्याची पिण्याच्या पाण्याची आण िसिंचनाची भिस्त असलेल्या दारणा हे धरण 77 टक्के भरले आहे. तर गेली चार दिवसात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातही दमदार पाउस झाल्याने या भागातील कडवा धरण काल रात्री पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे.तर भावली धरणाचा कमी झालेला पाण्याचा साठा पूर्ववत झाला असून हे धरणही काल पुन्हा पूर्ण भरले आहे.
इगतपुरी तालुक्यात सुरु वातीच्या काळात तब्बल मिहनाभर उशिराने पावसाचे आगमन झाले,त्यानंतर पावसाने तब्बल मिहनाभर विश्रांती घेतल्याने तालुक्यातील धरणे भरतात कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र गेली चार दिवसापासून इगतपुरी तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील दारणा,मुकणे,वैतरणा,कडवा,भावली आदी धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.यातील दारणा धरण ?? टक्के भरले असून,कडवा धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर भावली धरणही पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहे. गेली चार दिवसापासून मुसळ धार पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.चार दिवसापासुन झालेल्या दमदार पावसाने काही दिवसातच ही सरासरी भरु न काढली आहे.दमदार पावसाने अल्प कालात सरासरी इतका पाउस पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या पाउस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे आज दिवसभरातही पावसाची संततधार कायम होती.तालुक्यात आतापर्यंत 2448 मी.मी.एकूण पाउस झाला आहे.दारणा धरण 5503 टक्के भरले आहे. .तर भावली धरण क्षेत्रातही गेल्या चार दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने या धरणाच्या साठयात कमालीची वाढ झाली आहे. हे धरण पुन्हा ओव्हेल्फ्लो झाले आहे..दरम्यान या मुसळधार पावसामुले तालुक्यातील सर्व धरने,बंधारे आणि तलाव पूर्ण भरु न ओसंडून वाहत आहेत. दारणा: 5503 द. ल. घ. फु. (76.98 त्न), भावली:1434 द.ल.घ.फु.(100 त्न) , कडवा :1658 द. ल.घ.फु.(100 टक्के) (या धरणातून 800 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे), पाउस आजपर्यंतचा दारणा: 891 मिमी, घोटी 2970 मिमी, इगतपुरी 2448 मिमी, भावली 2347 मिमी़ (वार्ताहर)