मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:00+5:302021-07-16T04:12:00+5:30

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे समन्वयक हंसराज अहिरे, प्रदेश अध्यक्ष हिरामण गवळी, कार्याध्यक्ष अशोक भाले, ...

Dam of Malegaon Gawli Samaj Sanghatana | मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे

मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे समन्वयक हंसराज अहिरे, प्रदेश अध्यक्ष हिरामण गवळी, कार्याध्यक्ष अशोक भाले, महासचिव अशोक मंडले, उपाध्यक्ष वसंत नामागवळी व सुनील नामागवळी यांच्या आदेशावरून राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर ओबीसी समाजावर जो राजकीय अन्याय होत आहे त्यावर आवाज उठवण्यात आला. मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी व प्रांत,राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना गवळी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने याची त्वरित दखल घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी म.ग.स.चे उपाध्यक्ष वसंत गवळी, नगसेवक पापना गवळी, मनमाडचे नगरसेवक कैलास हिरणवाळे, भीमा हिरणवाळे, संतोष गोंडळकर, मालेगावचे गोविंद गवळी, भगवान पिरनाईक, सुनील उदीकर, विलास उदीकर, युवराज घुले व गवळी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Dam of Malegaon Gawli Samaj Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.