मुकणे धरणाचा विसर्ग बंद

By Admin | Updated: February 28, 2017 23:56 IST2017-02-28T23:56:05+5:302017-02-28T23:56:29+5:30

घोटी : मुकणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाविरोधात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.

The dam dam is closed | मुकणे धरणाचा विसर्ग बंद

मुकणे धरणाचा विसर्ग बंद

घोटी : मुकणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाविरोधात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या नवनिर्वाचित उमेदवारांच्या आक्रमक आंदोलनाचा धसका घेऊन जलसंपदा विभागाने आज पहाटेच पाण्याचे आवर्तन थांबविल्याने आंदोलन-कर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
शेकडो शेतकऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधी मुकणे धरणाचा दरवाजा बंद करणार असल्याने जलसंपदा विभागाने मंगळवारी पहाटेच पाण्याचे आवर्तन  थांबविले. आंदोलनाच्या धसक्याने पाणी थांबविल्याने शेतकऱ्यांनी मुकणे फाट्यावर आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुशीला मेंगाळ, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य भगवान आडोळे, जिजाबाई नाठे, राजाराम नाठे, विठ्ठल
लंगडे, जया कचरे, कल्पना हिंदोळे, विमल तोकडे, विमल गाढवे या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह रमेश धांडे, केरू पाटील देवकर, नाना गोवर्धने, पाडळी देशमुखचे सरपंच जयराम धांडे, शेवगेडांगचे सरपंच साहेबराव उत्तेकर, मदन चोरडिया, रामचंद्र गायकर, कुंडलिक जमधडे,  काशीनाथ भोर, नामदेव शेलार, नामदेव खातळे, नंदू पाडेकर, रामभाऊ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, देवराम गोवर्धने, शिवाजी गोवर्धने, भास्कर खातळे, रंगनाथ खातळे, मच्छिंद्र खातळे, संपत गोवर्धने, रामदास जमधडे, रमेश गोवर्धने आदिंसह शिवसैनिक उपस्थित  होते. (वार्ताहर)
मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतीला लाभदायक असणाऱ्या या धरणात अपेक्षित पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या साठ्यातून उन्हाळा आणि पावसाळ्याचे सुरु वातीचे काही दिवस या भागातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
जलसंपदा विभागाने या धरणातून गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे पाण्याचे आवर्तन सुरू केले होते. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा शेतीव्यवसाय धोक्यात आलेला होता. जिल्हा परिषद सदस्य सुशीला मेंगाळ यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत अधिकाऱ्यांना याबाबत ठणकावले होते.
 

Web Title: The dam dam is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.