मालेगावी नागरी सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:00 IST2020-08-11T21:23:53+5:302020-08-12T00:00:50+5:30
मालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मालेगाव शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी मनपाच्या प्रवेशदद्वारावर धरणे आंदोलन करताना मालेगाव अवाम पार्टीचे पदाधिकारी व महिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने मोकळ्या भुखंडावरील व रस्त्याकडेला असलेला घाणकचºयाची विल्हेवाट लावावी.
सर्व्हे क्र. ९८/२ मधील आरक्षित जागेवरील अनधिकृत प्लॉट तुकड्यांची प्रक्रिया थांबविण्यात याव यासह शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात रिजवान बॅटरीवाला, झायदाबानो अन्सारी, शाहीद शहा, यासीर अरफात, सईदा शेख, फरीदा अन्सारी, इम्रान बॅटरीवाला आदींसह पदाधिकारी, महिलांनी सहभाग घेतला.