शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:27 IST

सायखेडा : गायी सांभाळून दूध विक्र ी करून गुजराण करणाऱ्या शेतकºयांना प्रत्येक दिवशी एका गायीच्या दुधामागे किमान ७० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने दुधाचे अर्थकारण जमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे

ठळक मुद्देदुधाचे अर्थकारण जुळत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

सायखेडा : गायी सांभाळून दूध विक्र ी करून गुजराण करणाऱ्या शेतकºयांना प्रत्येक दिवशी एका गायीच्या दुधामागे किमान ७० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने दुधाचे अर्थकारण जमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.एक गाय सांभाळण्यासाठी दिवसाला सुका आणि हिरवा चाºयासाठी दोनशे रुपये, पशुखाद्य १५० रुपये, औषधे ५० रुपये, देखभाल खर्च ५० रुपये असा सरासरी एकूण ४५० रुपये इतका खर्च येतो. एक गाय साधारण १५ ते २० लिटर दूध देते. आज कोणताही दूध संघ १९ रु. प्रतिलिटर या दराने दूध खरेदी करताना दिसत आहे. या भावात ३५० रुपये आर्थिक उत्पन्न मिळते. शेतकºयांना प्रतिदिवशी ७० रुपये तोटा सहन करावा लागत आहे.गायीला केवळ एकच चारा दिल्यास दुधाची फॅट चांगली लागत नाही. फॅटनुसार दररोज दुधाच्या भावात फरक पडतो त्यामुळे सुका, हिरवा, पशुखाद्य असा संमिश्र चारा द्यावा लागतो. या चाºयाचे बाजारात उपलब्धतेनुसार दररोज भाव बदलतात. मात्र दुधाचे भाव वाढत नाही ते नेहमी कमीच होतात. त्याचा आर्थिक फटका बसत असतो तो शेतकºयांनाच सहन करावा लागतो.नाशिक जिल्ह्यात अंदाजे सरासरी २ लाख गायी असून, किमान ४० हजार शेतकºयांचे कुटुंब दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे.अनेकांना दुसरा कोणताही आर्थिक उत्पादनाची संधी नसल्याने कुटुंब सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकºयांना दुग्ध जनावरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.शहरी भागातील नागरिक किरकोळ दूध घेताना जास्त पैसे मोजत असले तरी दूध उत्पादक शेतकºयांच्या हातात मात्र कमी पैसे मिळत आहे. त्यामुळे दुधाचे अर्थकारण जुळत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.गायीच्या दुधाला दूध संघाकडून १९ रु . प्रतिलिटर भाव मिळत असल्याने दुधाचे अर्थकारण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. चारा, पशुखाद्य, औषधे असा खूप खर्च येतो, तुलनेत पैसे होत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. सरकारने थेट अनुदान देण्याची गरज आहे.- संजय गामणे,दूध उत्पादक, वºहेदारणा