मुस्लिम भगिनींच्या हस्ते फोडली दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:09+5:302021-09-02T04:29:09+5:30

घोटी : कपारेश्वर महादेव देवस्थानात कळसूबाई मित्रमंडळाचा उपक्रम घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे निसर्गाच्या सानिध्यात, प्राचीन काळापासून ...

Dahihandi broken by Muslim sisters | मुस्लिम भगिनींच्या हस्ते फोडली दहीहंडी

मुस्लिम भगिनींच्या हस्ते फोडली दहीहंडी

घोटी : कपारेश्वर महादेव देवस्थानात कळसूबाई मित्रमंडळाचा उपक्रम

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे निसर्गाच्या सानिध्यात, प्राचीन काळापासून कपारीत असलेल्या कपारेश्वर महादेव देवस्थानात कळसूबाई मित्रमंडळाने दहीहंडी उत्सव साजरा केला. कपारेश्वर महादेवाचे पूजन सायरा खलिफा, नगमा खलिफा या दोघी मुस्लिम भगिनींनी केले. चिमुरड्या बालकृष्णाने दहीहंडी फोडून धार्मिक, सामाजिक एकोपा ठेवण्याचा संदेश सर्वांना दिला.

कोरोनाचे नियम पाळून उत्साहात कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी लोण्याचा प्रसाद उपस्थितांना देण्यात आला. या कार्यक्रमात कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सुरेश कडू, बाळासाहेब आरोटे, गजानन चव्हाण, बाळासाहेब चौधरी, काळू भोर, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, डॉ. महेंद्र आडोळे, सुरेश चव्हाण, बालाजी तुंबारे, गोकुळ चव्हाण, संतोष म्हसणे, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत, दीपक कडू, पुरुषोत्तम बोऱ्हाडे, जनार्दन दुभाषे, धनंजय बोऱ्हाडे, रमेश हेमके, भाऊसाहेब जोशी, सर्वेश मैले, गणेश काळे, प्रकाश तोकडे, गिर्यारोहक, बालगोपाल, महिला भगिनी सहभागी झाले होते. (३१ घोटी १)

310821\574131nsk_29_31082021_13.jpg

मुस्लिम भगिनींच्या हस्ते फोडली दहीहंडी.

Web Title: Dahihandi broken by Muslim sisters