भरवीर बुद्रुक शाळेत दहीहंडी
By Admin | Updated: August 27, 2016 22:18 IST2016-08-27T22:17:52+5:302016-08-27T22:18:06+5:30
भरवीर बुद्रुक शाळेत दहीहंडी

भरवीर बुद्रुक शाळेत दहीहंडी
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील चिमुकल्या मुलांनी श्रीकृष्ण, राधा, मीरा, सुदामा, गौळणी आदिंची वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला. यावेळी पाचवीच्या मुलांनी दहीहंडी फोडली. मुलांनी श्रीकृष्णाच्या गवळणी, भक्तिगीते सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शाळेच्या संस्थापक ज्योती झनकर, संपत झनकर, वैशाली शिंदे, राजश्री जमधडे, रोहिणी साबळे, सुनील शिरसाठ, सागर शिरसाठ, मनीष सुरु ंजे, शंकर घोडे, सुवर्णा पाथरे, वृषाली पागेरे, सुरेश लगड, विलास झनकर, विजय टोचे आदिंनी चिमुकल्या मुलांना मार्गदर्शन केले