चापडगावच्या सरपंचपदी दगू आव्हाड यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:53 IST2019-07-09T18:53:05+5:302019-07-09T18:53:39+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगावच्या सरपंचपदी दगू खंडू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदूरशिंगोटेचे मंडल अधिकारी बी. पी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

चापडगावच्या सरपंचपदी दगू आव्हाड यांची बिनविरोध निवड
मावळते सरपंच दत्तुपंत सांगळे यांनी आवर्तन पद्धतीने गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सरपंचपदासाठी दत्तात्रय सांगळे यांची स्वाक्षरी होती. अर्जाची छानणी झाल्यानंतर आव्हाड यांचा अर्ज वैध ठरला. सरपंचपदासाठी आव्हाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी शिरसाठ यांनी सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. निवडणुककामी ग्रामसेवक वाय. बी. पालखेडे, तलाठी तांबे यांनी सहकार्य केले. सरपंचपदाची निवड झाल्यानंतर मारूती मंदिराच्या सभामंडपात ग्रामस्थांची बैठक पार पडली. नवनिर्वाचित सरपंच आव्हाड यांचा संदीप सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच धोंड्याबाई मेंगाळ, सदस्य सखाराम बापू मेंगाळ, सोनू मेंगाळ, सावित्राबाई आगिवले. लिला मेंगाळ, भारती सांगळे, सतिश आव्हाड, फुलचंद सांगळे, राम आव्हाड, सुभाष आव्हाड, माजी सरपंच रामनाथ सांगळे, संगीता सांगळे, रामेश्वर वाघ, मोतीलाल सांगळे, अनिल सांगळे, वसंत आव्हाड, पंढरीनाथ आव्हाड, सोमनाथ आव्हाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.