वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

By Admin | Updated: May 25, 2016 22:40 IST2016-05-25T22:40:07+5:302016-05-25T22:40:32+5:30

वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

Dagger of the vehicle killed the dragon | वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

खामखेडा : अडीच वर्षातील दुसरी घटनाखामखेडा : खामखेडा शिवारातील मांगबारी घाटात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्या जागीच ठार झाला. बुधवारी पहाटे ह्या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांमुळे ही घटना लक्षात
आली.
खामखेडा गावाच्या उत्तरेस असलेल्या मांगबारी घाटातून सटाण्याकडे जाताना रस्त्याच्या कडेला मृतावस्थेतील बिबट्या दिसला. बिबट्या हालचाल करत नसल्यामुळे गावातील संतोष मोरे, विठ्ठल शेवाळे यांनी वनविभागास कळवले. बिबट्यास मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो जागीच मृत झाल्याचा अंदाज काढला. धडकेमुळे बिबट्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाल्याने तसेच पुढील दोघे पाय मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाच्या देवळा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपरिमंडळ अधिकारी ए. के. भालेराव, वनरक्षक आर. एस. गुंजाळ, एम. के. देवरे, टी. एम. भामरे, वनमजूर कैलास गांगुर्डे, राहुल बच्छाव आदिंनी सकाळी ७ च्या सुमारास घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांसमवेत पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: Dagger of the vehicle killed the dragon