दरोडा, लुटमारीतील टोळक्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:07 IST2017-09-08T23:59:06+5:302017-09-09T00:07:41+5:30
शहरात दरोडा तसेच लुटमार करणाºया टोळीतील सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास शहर गुन्हे शाखेस यश आले आहे़

दरोडा, लुटमारीतील टोळक्यास अटक
नाशिक : शहरात दरोडा तसेच लुटमार करणाºया टोळीतील सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास शहर गुन्हे शाखेस यश आले आहे़ गुन्हे शाखेच्या युनिट एकने संशयित पवन राजेंद्र वाडेकर (२५, रा. गुरुकृपा हाइट्स, हिरावाडी), वीरेंद्र ऊर्फ बिºया यशपाल शर्मा (३२, रा. पत्रागल्ली, भारतनगर), अजीज ऊर्फ भय्या इशाक शहा (३०, रा. सावित्रीबाई फुलेनगर, वडाळा),आसीफ रज्जाक सैयद (रा. अशोकामार्ग), शादाब सलीम पिरजादे (२३, रा. ममतानगर, अशोकामार्ग), अमीर यामीन ऊर्फ सत्त्या अन्सारी (२५, रा. नानावली, अमरधामरोड, भद्रकाली), या सहा संशयितांना अटक केली आहे़ शहरातील दरोडा तसेच लुटमार प्रकरणातील संशयित द्वारका सर्कलवर येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे व सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, भीमराव गायकवाड, चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, संजय पाठक, पोपट करवाळ, वसंत पांडव, संजय मुळक, रवींद्र बागुल यांनी सापळा रचला़ संशयित पवन वाडेकर हा द्वारका हॉटेलजवळ येताच त्यास ताब्यात घेण्यात आले़ पोलिसी स्टाइलने वाडेकरची चौकशी केल्यानंतर त्याने दरोडा व लुटमारीच्या गुन्ह्णांची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली.