जिल्हा बॅँकेच्या रानवड शाखेत दरोडा

By Admin | Updated: August 26, 2015 00:28 IST2015-08-26T00:28:29+5:302015-08-26T00:28:29+5:30

गुन्हा दाखल : सोन्यासह लाखोंच्या ऐवजाची लूट

Dacoity at District Bank's Ranawat branch | जिल्हा बॅँकेच्या रानवड शाखेत दरोडा

जिल्हा बॅँकेच्या रानवड शाखेत दरोडा

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रानवड जिल्हा बॅँक शाखेच्या स्ट्रॉँगरूममधील ७५ पैकी ४४ लॉकर्स गॅस कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड आणि सोने लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. चोरट्यांनी नेमका किती ऐवज लूटला याचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंतपासून जवळ असलेल्या जिल्हा बॅँकेच्या रानवड शाखेत सोमवारी (दि. २४) रात्री १० वाजेनंतर बॅँकेच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बॅँकेने रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंसाठी तयार केलेल्या स्ट्रॉँगरूममध्ये प्रवेश केला. त्या स्ट्रॉँगरूममधील ७५ पैकी ४४ लॉकर्स गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात चोरटे यशस्वी झाले. मात्र लॉकर्सच्याच बाजूला लहान तिजोरीत असलेली १४ लाख ३७ हजार रूपयांची रक्कम सुरक्षित राहिली. याबाबत शाखेचे व्यवस्थापक प्रताप मधुकर निकम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Dacoity at District Bank's Ranawat branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.