दाभाडीत पडोस युवा संसदेचा समारोप

By Admin | Updated: December 31, 2015 23:21 IST2015-12-31T23:17:49+5:302015-12-31T23:21:16+5:30

दाभाडीत पडोस युवा संसदेचा समारोप

Dabardita Padoss Youth Parliament concludes | दाभाडीत पडोस युवा संसदेचा समारोप

दाभाडीत पडोस युवा संसदेचा समारोप

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथे नेहरू युवा केंद्र नाशिक संलग्न श्रमसंस्कार युवा सामाजिक संस्थेच्या वतीने पडोस युवा संसद घेण्यात आली. त्यात युवा नेतृत्व विकास कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू निकम, पंचायत समितीचे उपसभापती यशवंत मानकर, भिला ठाकरे, अजय बाविस्कर, आर. पी. पवार, हरी निकम, नंदलाल सुपारे, भगवान गवई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. राष्ट्रहित जनहित या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सुकन्या देवरे, प्रज्ञा निकम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळविला.
यावेळी विद्या मुठेकर, प्रशांत
वाघ, तुकाराम गायकवाड, सतीश सुपारे, पुरुषोत्तम निकम, सीमा सुपारे, शीतल निकम, शीतल वाघ, राहुल थोरात, लक्ष्मीबाई सुपारे, मीना गायकवाड, प्रशांत अहिरे, ज्ञानेश्वर निकम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dabardita Padoss Youth Parliament concludes