पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सायक्लिस्टचा पुढाकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:04+5:302021-09-06T04:18:04+5:30
नाशिक : शहरातील नागरिकांनी पर्यावरणाची हानी टाळून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने पुढाकार घेत ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सायक्लिस्टचा पुढाकार !
नाशिक : शहरातील नागरिकांनी पर्यावरणाची हानी टाळून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने पुढाकार घेत रविवारी सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. साईनाथनगरच्या जसपाल सिंग बिर्दी सायकल ट्रॅकपासून सकाळी सात वाजता या प्रबोधन फेरीला प्रारंभ झाला. इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांना पर्यावरण पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा हा संदेश देऊन प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर सायकल राइडचे प्रस्थान मुंबई नाका, त्रंबक नाका, गोल्फ क्लब मैदान येथे झाले. गोल्फ क्लब मैदानावर पुन्हा नागरिकांना इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त नाशिक सायकलिस्टसच्या फाउंडेशनच्या एस. टी. आहेर, गणेश लोहार, डॉ. योगिता घुमरे, मंगला सुरसे, रायभान दवंगे, माधव पवार या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी जन प्रबोधनासाठी वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी नाशिक सायकलिस्ट्सचे ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, सचिव डॉ. मनीषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, अविनाश लोखंडे, प्रवीण कोकाटे, राजेश्वर सूर्यवंशी, जाकीर पठाण, दविंदर भेला, मोहन देसाई यांनी पुढाकार घेतला.
इन्फो
फलकांद्वारे प्रबोधन
सायकलला जनजागृतीचे फलक लावलेले होते. गणेश पूजेचे एकच नियोजन - घरी स्थापना घरीच विसर्जन, निर्माल्य कलशात टाका - गोदामाईचे पावित्र्य राखा, करू या स्थापना छोट्या गणेशाची - भावभक्ती ठेवून मोठ्या मनाची, शाडू मातीचे बाप्पा घरी आणा, करू या स्थापना, छोट्या गणेशाची, पर्यावरणपूरक सजावट करा, असे संदेश देणारे फलक सायकलला लावण्यात आले होते. त्यामुळे सर्व मार्गावरील प्रत्येकाचे प्रबोधन घडून आले.
फोटो
०५नाशिक सायकलिस्ट