शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

गंगापुर धरणाच्या भींतीवर सायकलिंग; ३५ महागड्या सायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 2:50 PM

गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली.

ठळक मुद्देशासकिय नियमांची उच्चशिक्षित युवकांकडून पायदळी

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारा अत्यंत महत्त्वाच्या गंगापूर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन शिथिल होताच हौशी सायकलपटूंची घुसखोरी वाढू लागली आहे. शहरातील काही हायप्रोफाईल सायकलपटू थेट भिंतीच्या वरील बाजूने असलेल्या रस्त्यावर सायकलिंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.१३) उघडकीस आला. जलसंपदा विभागाने ग्रामिण पोलिसांच्या मदतीने कारवाई करत ३५ सायकली जप्त केल्या आहेत.सायकल चळवळ रुजविणारे शहर म्हणून नाशिकची नवी ओळख बनत आहे. शहरातील विविध सायकलपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकाविला आहे. सायकलचा सराव हा रस्त्यांवर केला जाणे अपेक्षित आहे; मात्र काही हौशी मंडळींकडून आपल्या सायकली थेट गंगापुर धरणासारख्या अत्यंत संवेदनशील व प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरात धाडल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील अशा काही हौशी हुल्लडबाज सायकलपटूंना रविवारी जलसंपदा विभागाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने चांगलाच दणका दिला. त्यांच्या ताब्यातील महागड्या सायकली जप्तीची मोहीम राबविली. दिवसभरात तब्बल ३५ सायकली जप्त करण्यास प्रशासनाला यश आले.

विकेंड ला गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. या तक्रारींची दखल घेत गंगापूर धरणाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी सायकल जप्तीची मोहीम राबविली. शनिवारी दहा आणि रविवारी २५ अशा एकुण ३५ सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणCyclingसायकलिंगnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयPoliceपोलिस