राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:32+5:302021-02-05T05:46:32+5:30
नाशिक : राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून सायकल रॅलीद्वारे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मतदानाबद्दल जनजागृती व्हावी, या ...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅली
नाशिक : राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून सायकल रॅलीद्वारे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मतदानाबद्दल जनजागृती व्हावी, या अनुषंगाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सोमवारी (दि. २५) सकाळी ८ वाजता हुतात्मा स्मारक येथे निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दोनच्या लाईनमध्ये वाहतुकीचे नियम पाळून ही रॅली हुतात्मा स्मारक - जुने सीबीएस - शालीमार चौक - प .सा. नाट्यगृह- मेहेर सिग्नल - हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी डिजिटल निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती दिली. तसेच १९५० या हेल्प लाईन टोल फ्री नंबरवर निवडणूक प्रक्रियेविषयी संपर्क करण्याबद्दल सांगितले. मतदान ओळखपत्र हे डिजिटल होणार आहे, याबद्दलही माहिती दिली. रॅली यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नाशिक सायकलिस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, खजिनदार रवींद्र दुसाने, सचिव डॉ.मनीषा रौंदळ,किशोर माने, मोहन देसाई, माधुरी गडाख यांचे सहकार्य लाभले.
फोटो
२५सायकल रॅली