देवळ्याच्या कैरी बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:42+5:302021-06-23T04:10:42+5:30

देवळा : दरवर्षी लोणच्याच्या कैरीसाठी प्रसिद्ध असलेला देवळा येथे भरणारा कैरी बाजार कोरोनामुळे गतवर्षी भरला नाही, तर यंदा कैरी ...

Customers wait for the temple's carry market - A | देवळ्याच्या कैरी बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा - A

देवळ्याच्या कैरी बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा - A

देवळा : दरवर्षी लोणच्याच्या कैरीसाठी प्रसिद्ध असलेला देवळा येथे भरणारा कैरी बाजार कोरोनामुळे गतवर्षी भरला नाही, तर यंदा कैरी बाजार भरूनही ग्राहकांअभावी बाजार फुलला नाही.

देवळा येथे बसस्थानक परिसरात देवळा - कळवण रस्त्यावर जून महिन्यात पहिला पाऊस पडल्यानंतर भरणारा कैरी बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. सुरगाणा, पेठ, कळवण आदी तालुक्यांतून येथे विक्रीसाठी येणारी गावठी कैरी लोणच्यासाठी उत्कृष्ट असल्यामुळे देवळा शहरासह ग्रामीण भागातील गृहिणींची लोणचे भरण्यासाठी ह्या कैरीला मोठी मागणी असते. दरवर्षी लोणचे भरण्यासाठी हा कैरी बाजार भरण्याची सर्वजण प्रतीक्षा करीत असतात. परंतु गतवर्षी कोरोनाचे आगमन झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले. कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी देवळा येथे भरणारा आठवडे बाजार तसेच शनिवारी व रविवारी भरणारा कैरी बाजारही बंद करण्यात आले. यामुळे गतवर्षी देवळा येथे कैरी बाजार भरला नाही. यामुळे गृहिणींची मोठी गैरसोय झाली. यावर्षी मात्र देवळा शहरात कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. नगरपंचायत प्रशासनानेदेखील नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर देवळा येथे कैरी बाजार पुन्हा भरला.

इन्फो ४०० ते १२०० रुपये

शेकडा

गतवर्षीचा अनुभव जमेस धरून यावर्षी नागरिकांनी मिळतील तिथून लोणचे भरण्यासाठी कैऱ्या उपलब्ध करून घेतल्या. चालूवर्षी परिसरात आंब्यांना बहरही चांगला आला होता. लोणचे भरण्यासाठी सर्वत्र कैऱ्या उपलब्ध होत्या. यामुळे देवळा येथील कैरी बाजार फुलण्यापूर्वीच बहुतांश महिलांचे कैरीचे लोणचे भरले गेले होते. यामुळे शहरात कैरी बाजारात कोकणातील कैरी येऊनही कैरी बाजारात ग्राहकांची गर्दी कमी दिसून आली. कैरीच्या दर्जानुसार शंभर कैऱ्यांसाठी ४०० ते १,२०० रुपये असा दर होता.

फोटो - २१ देवळा मँगो

देवळा येथे भरलेला कैरी बाजार.

===Photopath===

210621\545821nsk_12_21062021_13.jpg

===Caption===

फोटो - २१ देवळा मँगोदेवळा येथे भरलेला कैरी बाजार

Web Title: Customers wait for the temple's carry market - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.